लष्कराची 2 हुतात्मा जवानांना आदरांजली

पीटीआय
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

श्रीनगरमधील बदामी बाग कँटोन्मेंट येथे पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांच्या शौर्याला सलाम करीत भारतीय लष्कराच्या वतीने आज (सोमवार) त्यांना सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्यात आली. 

लान्स नायक भंडोरिया गोपाल सिंग आणि शिपाई रघुवीर सिंग हे काल (रविवार) एका चकमकीत हुतात्मा झाले. या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यावेळी एक नागरिक मृत्युमुखी पडला, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.  

श्रीनगरमधील बदामी बाग कँटोन्मेंट येथे पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
"चिनार कॉर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल के.के. पंत यांनी कॉर्प्स कमांडर आणि सर्व कॉर्प्सच्या वतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच, काश्मीरचे विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक यांच्यासह सामान्य प्रशासन आणि इतर सुरक्षा संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली," असे कर्नल कालिया यांनी सांगितले.
 

Web Title: Army pays tribute to 2 soldiers martyred in Kulgam encounter