काश्मीरमध्ये हिमवादळात 3 जवान हुतात्मा 

वृत्तसंस्था
Tuesday, 14 January 2020

काश्मीरमध्ये सोमवारी पाऊस आणि बर्फवृष्टीही झाली आहे. बारामुला, बंदीपोरा आणि गंदरबाल भागात भूस्खलन झाल्याने अनेक घरे दबली गेली आहेत. एक कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. 

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमवादळामुळे 45 राष्ट्रीय रायफल्सचे तीन जवाना हुतात्मा झाले असून, दोन जवान बेपत्ता आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये गेल्या 48 तासांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. माछिल सेक्टरमध्ये रिंगबाला परिसरात आलेल्या हिमवादळात 45 राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान बेपत्ता झाले. यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून, दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

काश्मीरमध्ये सोमवारी पाऊस आणि बर्फवृष्टीही झाली आहे. बारामुला, बंदीपोरा आणि गंदरबाल भागात भूस्खलन झाल्याने अनेक घरे दबली गेली आहेत. एक कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Personnel Hit By Avalanche in The North Kashmir Area