लष्कराच्या जवानाचा शाळा संचालकावर गोळीबार, मुलीला चापट मारल्याचा राग

Soldier Firing at school Director
Soldier Firing at school Directore sakal

जयपूर : राजस्थानच्या भरतपूर (Bharatpur Rajasthan) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने मुलीला चापट मारल्याच्या रागातून लष्काराच्या जवानाने (Army Soldier) थेट शाळेच्या संचालकावर गोळीबार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Soldier Firing at school Director
सासऱ्याचा कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ बनवणाऱ्या सुनेलाही मारहाण

पप्पू गुर्जर हा लष्करातील जवान असून ते सध्या सुट्ट्या घेऊन घरी आले आहेत. त्याची मुलगी ही कानवाडा गावातील एका खासगी शाळेत शिकते. गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे तिला शिक्षकाने एक चापट मारली होती. त्यामुळे तिने शिक्षकाची तक्रार आपल्या वडिलांकडे केली. माझ्या मुलीला का मारले? याचा जाब विचारण्यासाठी तो पत्नी आणि मुलीला घेऊन शाळेच्या संचालकांना भेटायला गेला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर गुर्जरने शाळेच्या संचालकावर बंदूक रोखली. मात्र, मध्येच गुर्जरची पत्नी आली. त्यामुळे तिच्या हाताला गोळी लागली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत गुर्जर पळून जाण्यात यशस्वी झाली होता. तो सुट्ट्यावर घरी आला होता आणि शाळेच्या संचालकांना भेटायला गेला तेव्हा त्याने आपली बंदूक सोबत नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर कामा दौलत सिंग यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com