लष्करातील महिला अधिकाऱ्याची जम्मूत आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

जम्मू : लष्करातील महिला अधिकारी मेजर अनिता कुमारी (वय 36) यांनी स्वतःच्या पिस्तुलाने डोक्‍यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. जम्मूतील बारी ब्राह्मना कॅंटोन्मेंटमधील सरकारी निवासस्थानी गुरुवारी रात्री ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

मूळच्या हिमाचल प्रदेशमधील चंबा येथील अनिता कुमारी आठ वर्षांपूर्वी लष्करी सेवेत आल्या होत्या. जम्मूत 259 फिल्ड सप्लाय विभागात त्यांची नेमणूक झाली होती. त्यांचे पती कुमार अनुभव अभियंते असून, ते दिल्लीत राहतात, अशी माहिती येथील पोलिस प्रमुख यशपालसिंग यांनी दिली.

अनिता कुमारी शुक्रवारी कामावर गेल्या नव्हत्या. त्या कोठे आहेत हे कोणालाही माहीत नव्हते. शेजारी राहणाऱ्यांनी घराचे दार तोडल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
 
Web Title: army woman officer major anita kumari commits suicide