Arnab Cyclone: 'अर्णब' चक्रीवादळाचा झारखंडला तडाखा; रांची अन् जमशेदपूरमधील शाळा २ दिवस बंद, प्रशासनाकडून हाय अलर्ट video viral

Ranchi Jamshedpur Weather Alert : ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये पाऊस, वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रांची आणि पूर्व सिंहभूम जिल्ह्यांतील शाळा २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत
Authorities have announced a two-day school closure in parts of Jharkhand amid cyclone-related weather warnings.

Authorities have announced a two-day school closure in parts of Jharkhand amid cyclone-related weather warnings.

esakal

Updated on: 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ या तीव्र चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह पूर्व भारतातील काही राज्यांवर परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभागाने २८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ असून बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान किनारा ओलांडण्याची प्रक्रिया सुरू होती. या हवामान प्रणालीमुळे झारखंडमध्येही पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com