पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

BJP
BJP

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ मेरठमधील कंकरखेडा परिसरातील आहे. येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर भाजपा नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. आता आरोपी भाजप नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (ता. 19) रात्री मेरठमधील एका हॉटेलमध्ये पोलिस अधिकारी एका महिला वकिलासोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेलचे मालक आणि त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर हॉटेलच्या मालकांनी भाजपाचे स्थानिक नगरसेवक मनिष पवार यांना सविस्तर घटनेबाबत कळविले आणि घटनास्थळी बोलाविले. मनिष पवार आल्यानंतर पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली आणि त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये नगरसेवकाने मारल्यानंतर पोलिस अधिकारी खाली पडलेला स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, याप्रकरणी नगरसेवक मनिष पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी अटकही केली असून पुढील चौकशी चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com