'मला अटक करुन दाखवा'; राहुल गांधींचं ओपन चॅलेंज

Rahul-Gandhi
Rahul-Gandhi
Updated on
Summary

मोदी सरकारवर टीका करणारे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी 25 जणांना अटक केली होती

नवी दिल्ली- मोदी सरकारवर टीका करणारे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी 25 जणांना अटक केली होती. पोस्टरमध्ये कोरोना लशींच्या पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. 'मलाही अटक करा' असं आव्हान राहुल यांनी केलं असून आमच्या मुलांची कोरोना प्रतिबंधक लस विदेशात का पाठवली, असा प्रश्न विचारला आहे.

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना केंद्र सरकारने विदेशांना लशीचा पुरवठा केला होता. या संदर्भात दिल्लीतील काही लोकांनी पोस्टरबाजी करत केंद्र सरकारवर टीका केली होती. आमच्या लहान मुलांची कोरोना प्रतिबंधक लस विदेशात का पाठवली, अशा मजकुराखाली पोस्टर लावण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केले आणि 25 जणांना अटक केली होती. राहुल गांधींनी याचीच री ओढल्याचं पाहायला मिळालं आहे.

Rahul-Gandhi
Tauktae : मुंबईत सोमवारीही लसीकरण बंद!

देशात कोरोनाचा कहर सुरु असून दुसरी लाट गंभीर बनली आहे. काँग्रेसने वारंवार केंद्र सरकारच्या नियोजनावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या ठिसाळ पॉलिजीमुळे देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे, असं गांधी म्हणाले. गंगा नदीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी आई गंगेलाही रडायला लावलं. सरकारचं असंच काम सुरु राहिलं, तर देशात कोरोनाची तिसरी लाट येईल. देशाला एका योग्य लस रणनीतीची गरज आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात तीन लाख 11 हजार 170 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर चार हजार 77 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तीन लाख 62 हजार हजार 437 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवला आहे. आरोग्य व्यवस्थेचा उडालेल्या बोजवारामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरीही मृत्यूनं चिंता वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com