esakal | कलम ३७०, ट्रिपल तलाक झालं; मोदी 15 ऑगस्टला आता काय बोलणार?
sakal

बोलून बातमी शोधा

narendra-modi-1.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कलम ३७०, ट्रिपल तलाक झालं; मोदी 15 ऑगस्टला आता काय बोलणार?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी या दिवसी कोरोना विषाणूवरील लसीची घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदी यांना घोषणा करता यावी यासाठी लस निर्मितीसाठी घाई करण्यात येत असल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. मात्र आता याबाबतच्या चर्चा होणे बंद झाल्या असून 2021 पर्यंत लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन कोरोनाच्या छायेत पार पडणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी खूप कमी लोकांना या कार्यक्रमासाठी बोलावलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात यावेळी कोणता मुद्दा असेल याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. 

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

मागील वर्षी मे महिन्यात निवडणुका जिंकल्यानंतर मोदी यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. यात जम्मु-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवणे आणि तीन तलाक यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. मोदी यांनी नवे सरकार सत्तेत आल्यानंतर 10 आठवड्यांच्या आत कलम 370 आणि 35 ए काढून टाकला होता. याप्रकरणी बोलताना मोदी म्हणाले होते की, आम्ही कोणत्याही समस्येला ठेवत नाही आणि टाळतही नाही. सर्वांना वाटत होतं हे कोण करेल. काँग्रेसने कलम 371 ला नेहमीच राजकीय मुद्दा बनवला. हा मुद्दा इतका महत्वाचा होता तर मग 70 वर्षांपर्यत यावर निर्णय का घेण्यात आला नाही?

तीन तलाकच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदी यांनी जोर दिला होता. याआधी मुस्लीम माता-भगिनी भीतीच्या वातावरणात जगत होत्या. त्यांना नेहमी पतीकडून तीन तलाकची भीती असायची. पण आता असं होणार नाही. जगातील अनेक मुस्लीम देशांनी याला हटवलं आहे, असं ते म्हणाले होते. मोदी यांनी जीएसटीवरही भाष्य केलं होतं. 'एक देश एक कर'चे स्वप्न साकार झाले असल्याचं ते म्हणाले होते. सरकारने नागरिक दुरुस्ती कायदाही संसदेत मंजूर करुन घेतला आहे. शिवाय 'एक देश एक निवडणूक' याविषयीही चर्चा सुरु झाली आहे. 

चरखा ते अशोक चक्र; तिरंग्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

पंतप्रधान मोदी 15 ऑगस्ट रोजी जेव्हा लाल किल्ल्यावरुन भाषण करतील तेव्हा त्यांच्यासमोर कोरोना विषाणू, लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, बेरोजगारी, चीन-पाकिस्तानकडून सीमेवर मिळणारे आव्हान, लडाख भागात चिनी सैनिकांशी लढताना भारताचे 20 जवान शहीद झाल्याची घटना, नेपाळसोबत निर्माण झालेला सीमावाद, इराणसोबतचे संबंध असे मुद्दे असणार आहेत. विरोधक मोदी यांच्यावर चीनसमोर नमते घेतल्याची टीका वारंवार करत आहेत. चीनने भारतीय भूमित घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. पंतप्रधान मोदी वरील मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या वचननाम्यात राम मंदिर, जम्मू-काश्मीरला लागू असलेला कलम 370 काढून टाकणे यासारखे मुद्दे होते. हे मुद्दे मोदी सरकारने निकालात काढले आहेत. भाजपच्या वचननाम्यात समान नागरिक कायदाच्या आणखी एक मुद्दा आहे. यावेळी मोदी या विषयाला हात घालण्याची शक्यताही अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. 

(edited by-kartik pujari)

loading image