न्यायदानातील विलंब टाळण्यासाठी सरन्यायाधीशांनी सांगितला 'हा' पर्याय!

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

विलंब टाळला जावा, यासाठी न्यायप्रक्रियेला अनुरूप 'एआय' तंत्रज्ञान विकास केला जाण्याची शक्‍यता आहे.

बंगळूर : न्यायप्रक्रियेत काही वेळा होणारा अनावश्‍यक विलंब टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्‍यता सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी बोलून दाखविली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यायिक अधिकाऱ्यांच्या द्विवार्षिक परिषदेच्या उद्‌घाटनासाठी सरन्यायाधीश बोबडे येथे आले होते. या वेळी ते म्हणाले, की न्यायदानामध्ये अनावश्‍यक विलंब टाळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बुद्धिमान लोकांचा प्रभावीपणे वापर करून घेतला पाहिजे.

- 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' सोबत महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाची भागीदारी

न्यायाला विलंब झाला याचा अर्थ कोणी कायदा हातात घ्यावा, असा होत नाही. केवळ हा विलंब टाळला जावा, यासाठी न्यायप्रक्रियेला अनुरूप 'एआय' तंत्रज्ञान विकास केला जाण्याची शक्‍यता आहे. अर्थात, हे तंत्रज्ञान न्यायाधीशांची जागा कधीही घेऊ शकत नाही. 

- लोकांच्या त्रासासाठीच मंत्री झालोय : बच्चू कडू

'केवळ न्यायप्रक्रियेतील गणिती भाग आणि समान प्रक्रिया करताना होणारा विलंब टाळण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे. हे तंत्रज्ञान न्यायाधीशाची जागा घेऊ शकणार नाही. मानवी सद्‌सद्विवेकबुद्धीला पर्याय नाही. 
- सरन्यायाधीश शरद बोबडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial intelligence will used to fast track justice delivery said CJI Sharad Bobde