'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' सोबत महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाची भागीदारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार

मुंबई - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने नुकत्याच रिलीज झालेल्या अभिनेता अजय देवगणच्या  'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटासोबत भागीदारी केलीये. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विस्मरणात गेलेल्या गड - किल्ले, तसंच शूरवीरांची गौरवगाथा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. सोबतच  महाराष्ट्रातील पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे. 

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'

या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवरायांच्या महाराष्ट्रातील समृद्ध वारशाचा गौरव करण्यात येईल. सोबतच महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे. यामुळे तान्हाजींसारख्या योद्धांच्या शौर्याची आठवण करून देण्यासाठी  एक को-ब्रँडेड टीव्हीसी तयार केली जाणार आहे, जी  टीव्ही, सिनेमा अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

मोठी बातमी - ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

महाराष्ट्रात अनेक वारसास्थळे आहेत. ही सर्व वारसास्थळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच प्रेरणा देतात. त्यामुळे ही स्थळे आपल्या विशाल इतिहासाच्या घटना जतन करतात. आपल्यातील प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कृत्याबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे, असं पर्यटन संचालक दिलीप गावडे यांनी म्हटलंय 

मोठी बातमी -  तीर रपकन घुसला तिच्या मानेत, लागलेला तीर एक दिवस मानेतच..

महाराष्ट्रातील गड -किल्ल्यांसंदर्भात फोटो आणि व्हिडिओ स्पर्धा 

याच उपक्रमाचा एक टप्पा म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील  किल्ल्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ स्पर्धादेखील सुरू केली आहे. यामध्ये हौशी  आणि व्यावसायिक छायाचित्रकार सहभाग घेऊ शकतात. यासंबंधीची संपूर्ण माहिती पर्यटन विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहे. 

maharashtra tourism directorate partnered with the film Tanhaji The Unsung Warrior


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra tourism directorate partnered with the film Tanhaji The Unsung Warrior