जेटली तीन महिन्यांनंतर परतले अर्थ मंत्रालयात

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

अर्थमंत्री अरूण जेटली (वय 65) यांच्यावर 14 मेला मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया झाली होते. त्यासाठी ते एप्रिल महिन्यापासून सक्तीच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल हे अर्थमंत्रालयाचे कामकाज बघत होते.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरूण जेटली हे तीन महिन्यांच्या दीर्घ उपचारानंतर आज (ता. 23) अर्थ मंत्रालयाचा पदभार स्विकारतील. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार व पंतप्रधानांच्या निर्णयानुसार अर्थमंत्रालय व कोर्पोरेट मंत्रालयाचे कामकाज अरूण जेटली बघतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

अर्थमंत्री अरूण जेटली (वय 65) यांच्यावर 14 मेला मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया झाली होते. त्यासाठी ते एप्रिल महिन्यापासून सक्तीच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल हे अर्थमंत्रालयाचे कामकाज बघत होते. गेल्या महिन्यात राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीवेळी जेटली संसदेत उपस्थित होते. 

जेटली यांची 2014 रोजी बॅरिअॅट्रीक शस्त्रक्रिया झाली होती. मोठ्या प्रमाणातील मधुमेह व वजन वाढवण्यासाठी ही शस्त्रक्रिया केल्याचे, पीटीआयने सांगितले. जेटली हे सोशल मीडियावर कायम कायम सक्रीय होते. वस्तू व सेवाकरासंबंधी अनेक वेळा त्यांनी आपले मत सोशल मीडियावर मांडले.   

पंतप्रधान कार्यालयातील नॉर्थ ब्लॉकमधील जेटली यांच्या कार्यालयाची स्वच्छता व नूतनीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून जेटली यांना कसलाही संसर्ग होणार नाही.  

Web Title: arun jaitley back in finance ministry after 3 months rest