अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

पर्रीकर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह अन्य 12 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यांनी सोमवारी रात्री दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे.

नवी दिल्ली - मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (सोमवार) त्यांच्या पदाचा कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पर्रीकर यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

पर्रीकर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह अन्य 12 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यांनी सोमवारी रात्री दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. पर्रीकर यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी अतिरिक्तरित्या जेटलींकडे देण्यात आली आहे.

भाजपने कॅबिनेटमध्ये बदल होणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत. भाजप शासित राज्यांतील एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजप महासचिवाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पर्रीकर यांच्या जागी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी कोणावर टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Arun Jaitley given additional charge of Defence