संतप्त नागरिकांनी जाळला भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचा बंगला; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थीती आहे. राजधानी इटानगरमध्ये सध्या तणाव झाला असून संतप्त नागरिकांनी भाजपचे उपमुख्यमंत्री चौने मेन यांचा बंगला जाळला आहे.

इटानगर- अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थीती आहे. राजधानी इटानगरमध्ये सध्या तणाव झाला असून संतप्त नागरिकांनी भाजपचे उपमुख्यमंत्री चौने मेन यांचा बंगला जाळला आहे. मुळचे अरुणाचलचे नागरिक नसलेल्यांना नागरिकत्वाचा अधिकार देणं आणि काही जमातींचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करणं याला नागरिकांचा विरोध आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केलीत. लोकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर तरुणांचे जमाव जमले आणि त्यांनी तोडफोडीला सुरूवात केली. या तोडफोडीत एकाचा मृत्यू झाला असून, राजधानी इटानगरमध्ये उपमुख्यमंत्री चौने मेन यांचा बंगला संतप्त तरुणांनी फोडला आणि आवारात नासधूस केली आहे.

इटानगरच्या बाजारपेठेतही काही दुकानांना आगी लावण्यात आल्या. यात दुकानांतं मोठं नुकसान झालं. अनेक रस्त्यांवर टायर जाळून टाकण्यात आल्याने काही रस्ते बंद बाहतूकीसाठी बंद झाले होते. इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या जादा तुकड्या मागविण्यात आल्या असून इटानगर आणि काही शहरांमध्ये त्या तैनात करण्यात येणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून सरकारला पाहिजे ती मदत देण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Arunachal Pradesh 1 Killed Deputy Chief Ministers House Under Attack