

Laborers Truck Accident
ESakal
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात एक भयानक अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रक धोकादायक डोंगरी रस्त्यावरून घसरला आणि हजारो फूट खोल दरीत पडला. या अपघातात सुमारे २२ कामगारांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत फक्त एकाला जिवंत वाचवण्यात यश आले आहे. बुधवारी हा अपघात झाला. सर्व कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गेलापुखुरी चहाच्या मळ्यातील होते.