अरूणाचल सीमारेषेवर भारतीय लष्कराने वाढवले सैन्य

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

डोकलामच्या मुद्यावरून मागील वर्षी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे होते. हा वाद तब्बल ७३ दिवस सुरु होता. तसेच चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात होती आणि धमक्याही दिल्या जात होत्या. मात्र, भारताने संयमाने हा विषय हाताळल्याने हा वाद काही काळानंतर शमला होता. मात्र, डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे शांत झालेला नाही. 

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर भारतीय लष्कराकडून अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. डोकलामसारखा पेचप्रसंग पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय लष्कराकडून ही पावले उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय दाऊ-दिलाई, दिबांग आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात भारतीय लष्कराकडून गस्तही वाढविण्यात आली.

डोकलामच्या मुद्यावरून मागील वर्षी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे होते. हा वाद तब्बल ७३ दिवस सुरु होता. तसेच चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात होती आणि धमक्याही दिल्या जात होत्या. मात्र, भारताने संयमाने हा विषय हाताळल्याने हा वाद काही काळानंतर शमला होता. मात्र, डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही पूर्णपणे शांत झालेला नाही. 

दरम्यान, डोकलामच्या संघर्षानंतर आम्ही देखील आमची तयारी वाढवली आहे. कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे किबीथू येथे तैनात असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Arunachal Pradesh LOC Indian Army Increases their Army