Arvind Kejriwal: केजरीवालांना पुन्हा एक झटका! 'मुख्यमंत्री निवास'प्रकरणी सीबीआयनं सुरु केली चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal

Arvind Kejriwal: केजरीवालांना पुन्हा एक झटका! 'मुख्यमंत्री निवास'प्रकरणी सीबीआयनं सुरु केली चौकशी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एक झटका बसला आहे. मुख्यमंत्री निवास प्रकरणी सीबीआयनं दिल्ली सरकारविरोधात प्राथमिक चौकशीची नोंद करुन घेतली असून याच्या चौकशीलाही सुरुवात केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Arvind Kejriwal CBI registers Preliminary Enquiry to probe alleged irregularities in residence for Delhi CM)

नायब राज्यपालांचं पत्र

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यासाठी नवं निवासस्थानातील बांधकाम आणि नुतनीकरणात अनियमितता झाल्याचा आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप भाजपनं केला होता. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी देखील CBIला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या विनंतीवरुन सीबीआयनं प्राथमिक चौकशीची नोंद केली आहे.

सीबीआयच्या हालचालींवर आपचं प्रत्युत्तर

दरम्यान, सीबीआयच्या हालचालींवर आम आदमी पार्टीनं आक्षेप घेतला असून भाजप आपला संपवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचा आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं सर्व चौकशी एजन्सीज तैनात केल्या आहेत.

पण दिल्लीच्या २ कोटी जनतेचे आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत. त्यामुळं या चौकशीतून काहीही निष्पण्ण होणार नाही. भाजपनं कितीही चौकशा लावाव्यात अरविंद केजरीवाल हे सर्वसामान्यांच्या हितासाठी कायम लढत राहतील.