Ganesh Visarjan Pune
Ganesh Visarjan Pune

Ganesh Visarjan Pune: गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त उद्या कोणते रस्ते बंद, कोणते सुरु?

Ganapati Visarjan which roads are closed?
Published on

Ganesh Visarjan Pune: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत गुरुवारी (ता. २८) सकाळपासून शुक्रवारी (ता. २९) मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. तसेच, मिरवणूक कालावधीत दोन दिवस शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कालावधी-


(गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत) :


१. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ः काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
२. लक्ष्मी रस्ता ः संत कबीर चौकी ते टिळक चौक

(गुरुवारी सकाळी ९ ते मिरवणूक संपेपर्यंत) :


३. टिळक रस्ता ः जेधे चौक ते टिळक चौक
४. बगाडे रस्ता ः सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
५. गुरूनानक रस्ता- देवजीबाबा चौक ः हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक

(गुरुवारी सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत) :


६. गणेश रस्ता ः दारूवाला पूल ते जिजामाता चौक
७. केळकर रस्ता ः बुधवार चौक ते टिळक चौक
(गुरुवारी दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत) :
८. बाजीराव रस्ता ः बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
९. कुमठेकर रस्ता ः टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
१०. शास्त्री रस्ता ः सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक


(गुरुवारी सायंकाळी ४ ते मिरवणूक संपेपर्यंत) :


११. जंगली महाराज रस्ता ः झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
१२. कर्वे रस्ता ः नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
१३. फर्ग्युसन रस्ता ः खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार
१४. भांडारकर रस्ता ः पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक
१५. पुणे-सातारा रस्ता ः व्होल्गा चौक ते जेधे चौक
१६. सोलापूर रस्ता ः सेव्हन लव्हज (ढोले पाटील) चौक ते जेधे चौक
१७. प्रभात रस्ता ः डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

रिंग रोड :


(वरील बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असून, या रिंगरोडचा वापर करावा).
कर्वे रस्ता- नळस्टॉप चौक- विधी महाविद्यालय रस्ता- सेनापती बापट रस्ता- सेनापती बापट रस्ता जंक्शन - गणेशखिंड रस्ता- सिमला ऑफिस चौक- संचेती हॉस्पिटल चौक- इंजिनिअरिंग कॉलेज चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक- नरपतगीर चौक- नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी- सेव्हन लव्हज चौक- वखार महामंडळ चौक- शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केटयार्ड- मार्केटयार्ड जंक्शन- सातारा रस्त्याने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चित्रपटगृह)- सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक- सिंहगड रस्ता जंक्शन- लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादल पोलिस चौकी- अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळ स्टॉप.

डायव्हर्शन पॉइंट : याठिकाणी आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येईल.


१) जंगली महाराज रस्ता- झाशीची राणी चौक
२) छत्रपती शिवाजी महाराज रस्ता- काकासाहेब गाडगीळ पुतळा
३) मुदलियार रस्ता- अपोलो टॉकीज / दारूवाला पूल
४) लक्ष्मी रस्ता- संत कबीर पोलिस चौकी
५) सोलापूर रस्ता- सेव्हन लव्हज चौक
६) सातारा रस्ता- व्होल्गा चौक
७) बाजीराव रस्ता- सावरकर पुतळा चौक
८) लालबहादूर शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलिस चौकी
९) कर्वे रस्ता- नळ स्टॉप
१०) फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता- गुडलक चौक

या रस्त्यांवर नो-पार्किंग :


गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि महावितरण यांच्या वाहनांशिवाय सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य मिरवणूक मार्गांवर ‘नो-पार्किंग’ करण्यात येत आहे.
१) लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते टिळक चौक
२) केळकर रस्ता- बुधवार चौक ते टिळक चौक
३) कुमठेकर रस्ता- शनिपार चौक ते टिळक चौक
४) टिळक रस्ता- जेधे चौक ते टिळक चौक
५) बाजीराव रस्ता- पूरम चौक ते फुटका बुरूज चौक
६) शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
७) शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक
८) जंगली महाराज रस्ता- झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
९) कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक
१०) फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता- खंडोजीबाबा चौक ते गुडलक चौक
११) खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी राहील


वाहतूक नियंत्रण कक्ष आणि बंदोबस्त-


वाहतूक नियंत्रण कक्षातील मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग आणि वाहतूक डायव्हर्शन केलेल्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच, शहरात वाहतूक शाखेकडून पोलिस उपायुक्त, १३ पोलिस उपनिरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ७७५ पोलिस कर्मचारी आणि ३०० वॉर्डन आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com