राफेल करारावरुन अरविंद केजरीवालांचे नरेंद्र मोदींना तीन प्रश्न

वृत्तसंस्था
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

राफेल करारावरून आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमातून तीन प्रश्न केले आहेत. या तीन प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत असेही त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- राफेल करारावरून आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमातून तीन प्रश्न केले आहेत. या तीन प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत असेही त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मोदींनी सांगायला हवे की, त्यांनी हा करार अनिल अंबानी यांच्या रिलायन्ससोबतच का केला, बाकी आणखी काही कंपन्या होत्या त्यांच्यासोबतही हा करार मोदी करु शकले असते, परंतु त्यांनी या करारासाठी कमी अनुभव असलेल्या अनिल अंबानी यांच्याच कंपनीची निवड का केली. तसेच, अनिल अंबानी यांनी खूप वेळा सांगितलेले आहे की, त्यांचे मोदीसोबत वैयक्तिक संबध आहेत, आता यावर मोदींनी उत्तर द्यायला हवे की, हे संबध व्यावसायिक पण आहेत का ? त्याचबरोबर, राफेल करारामध्ये केलेल्या घोटाळ्यातील पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला आहे याचे उत्तरदेखिल मोदींनी द्यायला हवे. हा पैसा मोदींच्या भाजपच्या की अन्य कोणाच्या खिशात गेला आहे याचे उत्तर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी द्यायला हवे. अशा प्रकारचे थेट प्रश्न करुन अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांनी राफेल करारवरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राफेल करारावर मोदी अजूनही गप्प आहेत हे थक्क करणारे आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी परदेशी अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना चोर म्हटले आहे, हे खूपच निंदनीय असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला होता.

 

Web Title: Arvind Kejriwal Criticise on narendra Modi asks Three Question for Narendra Modi