Arvind Kejriwal News : रेवडी वाटणं हा देवाचा प्रसाद; पण मित्रांचं कर्ज....; केजरीवालांचा मोदींवर पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal Latest Marathi News

रेवडी वाटणं हा देवाचा प्रसाद; पण मित्रांचं कर्ज....; केजरीवालांचा मोदींवर पलटवार

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये (Gujrat) मोफत वीज (Free Electricity) देण्याची खेली खेळली आहे. गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून गुरुवारी राज्यात आपने सरकार स्थापन केल्यास प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सर्व जुनी बिले माफ करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांत या आश्वासनाची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले. (Arvind Kejriwal Latest Marathi News)

मोफत वीज (Free Electricity) ही जादू असल्याचे सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही जादू फक्त मलाच येते. असे आश्वासन कोणी देत ​​असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. जर त्यांच्या पक्षाचे सरकार आले तर दिल्ली (Delhi) आणि पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही (Gujrat) सरकार मोफत वीज देईल आणि २४ तास वीज दिली जाईल. तसेच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतची सर्व जुनी प्रलंबित बिले माफ केली जातील, असेही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

हेही वाचा: नूपुर शर्माला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम दिलासा; सक्तीची कारवाई न करण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत सुविधांचे वर्णन ‘रेवडी संस्कृती’ असे केले. यावर अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा प्रसाद आहे. रेवडी नाही. जनतेला मोफत सुविधा देणे हा देवाचा प्रसाद असून, आपल्या मित्रांचे कर्ज माफ करणे हे पाप असल्याचे ते म्हणाले.

हिमाचल प्रदेशात भाजपने १२५ युनिट वीज मोफत केले, पाणी मोफत केले, बसचे निम्मे भाडे आकारणार असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. शेवटी गुजरातशी वैर काय?

Web Title: Arvind Kejriwal Free Electricity Gujrat Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top