Arvind Kejriwal says he deserves Nobel Prize for good governance during Mohali event : मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुशासनासाठी नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. पंजाबमधील मोहाली येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.