अण्णा हजारेंच्या उत्पादन शुल्क धोरणावरील टीकेला केजरीवाल यांचं प्रत्युत्तर; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aravind Kejriwal and Anna Hajare

अण्णा हजारेंच्या उत्पादन शुल्क धोरणावरील टीकेला केजरीवाल यांचं प्रत्युत्तर; म्हणाले...

नवी दिल्ली : सरिता विहारमध्ये नवीन रुग्णालय बांधले जात आहे. हे ३३० खाटांचे रुग्णालय आहे, अशी सात रुग्णालये संपूर्ण दिल्लीत बांधली जात आहेत. कोरोनाच्या काळात हे रुग्णालये बांधायला सुरुवात केली आहे. आता कोरोना नाही पण संपूर्ण दिल्लीसाठी हे हॉस्पिटल उपयोगी पडेल. सरिता विहारमधील दिल्ली सरकारच्या नवीन रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने ८ ठार

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ज्या जागेवर रूग्णालय बांधले जात आहे त्या जागेबद्दल 20 वर्षांपासून बोलले जात आहे. परंतु आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे रूग्णालय तयार होईल अशी अपेक्षा आहे. जानेवारीपर्यंत एकूण 6 रुग्णालये तयार होतील.

यावेळी केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लिहिलेल्या पत्रालाही उत्तर दिले. केजरीवाल म्हणाले की, जेव्हा भाजप काही बोलते, मात्र जनता त्यांचे ऐकत नाही, तेव्हा ते कोणाला तरी समोर आणतात... पंजाब निवडणुकीच्यावेळी म्हणाले की अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत. मग त्यांनी कुमार विश्वास यांना पुढे केले.

हेही वाचा: पतीच्या ऑफीसमध्ये जाऊन शिवीगाळ करणं पत्नीची क्रूरताच; उच्च न्यायालयाचं निरीक्षण

आता त्यांनी सांगितले दारू घोटाळा झाला, मग सीबीआय म्हणाली की कोणताही घोटाळा झाला नाही. मग आता अण्णांना पुढं केल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. तसेच भाजप अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली.

Web Title: Arvind Kejriwal On Anna Hazare Letter Delhi Liquor Policy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..