
'प्रभू रामानं शबरीचं उष्टं बोर खालं होतं, परंतु हे लोक दलितांची हत्या करताहेत.'
..म्हणून उत्तर प्रदेश भाजपनं जिंकलं; केजरीवालांनी सांगितलं विजयाचं कारण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Election) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विजयाबद्दल मोठं विधान केलंय. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपला कोणताही पर्याय नसल्यामुळं ते विजयी झाले आहेत. बलाढ्य भाजपसमोर विरोधकांना टिकता आलं नाहीय, त्यामुळं भाजपचा विजय निश्चित झाला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधत हिंदुत्वाची व्याख्याही स्पष्ट केलीय.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांना विचारण्यात आलं की, तुम्ही भाजपच्या हिंदुत्वाला जातीयवादी म्हणत असाल, तर त्याचा प्रतिकार कराल का? याला प्रत्युत्तर देताना केजरीवाल म्हणाले, ‘माझी भाजपशी अथवा काँग्रेसशी कोणतीही लढाई नाहीय. तसंच हिंदुत्वाची व्याख्या मी अनेकदा दिलीय. माझा हिंदुत्वावर पूर्ण विश्वास आहे. रामायण (Ramayana) आणि गीतेत जे लिहिलंय ते हिंदुत्व आहे. रामायणात रामानं सांगितलेले शब्द प्रमाण आहेत. त्याचबरोबर भगवान रामानं एकमेकांचा द्वेष करायला शिकवलं नाहीय. प्रभू रामानं शबरीचं उष्टं बोर खालं होतं, परंतु हे लोक दलितांची हत्या करताहेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केलीय.
हेही वाचा: प्रदेश उपाध्यक्ष अकील अहमद यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
भाजपचं हिंदुत्व बरोबर नसेल, तर यूपीत इतकी मतं कशी काय मिळाली? याला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, भाजप समोर टिकण्यासाठी कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाहीय. सध्या सगळे विरोधक एकमेकांच्या हातावर हात ठेवून गप्प बसलेत. त्यामुळं भाजपला टक्कर देण्यासाठी कोणताही पर्याय उरला नाहीय. राष्ट्रीय स्तरावर पर्याय बनण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, देशातील लोकांना बदल हवाय. दोन राज्यात एक प्रामाणिक पक्ष निवडून आलाय. त्यामुळं जनतेसाठी आमचा जास्त-जास्त काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Web Title: Arvind Kejriwal Revealed About The Victory Of Bharatiya Janata Party In Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..