
देशातील सर्वात व्हीव्हीआयपी तिहार जेलचे माजी अधीक्षक सुनील गुप्ता यांनी एक मोठा खुलासा केला आहे. जेव्हा सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय तुरुंगात होते तेव्हा एअर होस्टेस दिवसातून दोन-तीन वेळा त्यांना भेटायला येत असत आणि त्यांच्यासोबत अनेक तास वेळ घालवत असत. सुब्रत रॉय यांच्या सेलमधून दारूच्या बाटल्या जप्त केल्याचा दावाही गुप्ता यांनी केला एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडेही तक्रार करण्यात आली पण कोणतीच कारवाई झाली नसल्याचे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.