देशभक्तीची भावना जागृतीसाठी केजरीवालांनी दिल्लीत 75 ठिकाणी फडकवला तिरंगा

दिल्लीतील ५०० ठिकाणी ध्वज बसवण्याचे लक्ष्य दिल्ली सरकारने ठेवले आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

दिल्ली: भारताच्या ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2022) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी काल(ता.२६) राजधानी दिल्लीत संपूर्ण शहरात ७५ वेगवेगळ्या ठिकाणी ११५ फूट राष्ट्रीय ध्वज फडकवला. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain)यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात दिल्लीतील ५०० ठिकाणी ध्वज बसवण्याचे लक्ष्य दिल्ली सरकारने ठेवलेआहे. त्यानुसार गेल्या वर्षी ध्वज लावण्याचे काम सुरू केले होते. यंदा ७५ वेगवेगळ्या केजरीवाल यांनी ठिकाणी ध्वज फडकवला.

Arvind Kejriwal
संजय राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ झालीये; दरेकर यांचा पलटवार

दिल्ली सरकारच्या 'देशभक्ती बजेट' अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारे राष्ट्रध्वज फडकवला जातो. जैन यांनी ट्विट केले की, "मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने २७ जानेवारी रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील ७५ ठिकाणी ११५ फूट उंच तिरंगा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला होता. कोट्यवधी देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दिल्ली सरकारने हा उद्देश ठेवला आहे.

दिल्लीकरांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी संपूर्ण दिल्लीत हा तिरंगा लावण्यात येत आहे. येत्या ऑगस्टपर्यंत दिल्लीच्या विविध भागात ध्वज लावले जातील.नवी दिल्ली, कालकाजी, पटपरगंड, शकूरबस्ती विधानसा परिसरात लावण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com