संजय राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ झालीये; दरेकर यांचा पलटवार

नौटंकी करणाऱ्यांना इतरांनी केलेल्या गोष्टी नौटंकीच वाटणार - प्रवीण दरेकर
political
politicalesakal
Summary

नौटंकी करणाऱ्यांना इतरांनी केलेल्या गोष्टी नौटंकीच वाटणार - प्रवीण दरेकर

मुंबईतील मलाड येथील क्रीडा मैदानाला टिपू सुलतानचे (Tipu Sultan) नाव देण्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधार यांच्यात टोलेबाजी सुरु आहे. भाजपाने (BJP) आक्रमक भूमिका घेतल्याने वाद चिघळण्याची शक्यताही वर्तवली जाता आहे. दरम्यान, आज शिवेसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्हाला टिपू सुलतानबद्दल माहिती असून भाजपकडून शिकण्याची गरज नसल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या टीकेवर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी पलटवार केला आहे.

दरेकर म्हणाले, नौटंकी करणाऱ्यांना इतरांनी केलेल्या गोष्टी नौटंकीच वाटणार आहेत. भाजप द्वेषाची संजय राऊत यांना कावीळ झाली आहे. त्यांनी किंवा शिवसेनेने (Shivsena) कधीच टिपू सुलतानाचा गौरव केलेला नाही. टिपूने लाखो हिंदूंचे धर्मांतर केले आहे. पण यासर्वांना डाव्या विचारसरणीच्या इतिहासकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने रंगवत वाचकांसमोर सादर केले आहे. टिपू सुलतान धर्म निरपेक्ष लोककल्याणकारी राजा नव्हता. शिवसेनेच्या या सर्व सत्तेसाठी चाली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

political
'टिपू सुलतान यांच्या नावावरुन भाजप जनतेची दिशाभूल करतंय'

पुढे ते म्हणाले, नवाब मलिक (Nawab Malik) यांनी टिपूचे कौतुक करायचा प्रश्नच येत नाही. नवाब मलिक हे हिंदूद्वेस्थे आहेत. आज ते काँग्रेसला लागून चालन करत आहे. या तिन्ही पक्षांना सत्ता महत्वाची वाटते. मुंबईमध्ये (Mumbai) भायखळ्याला उर्दू भाषा भवन करण्यामागे कारण काय? हे शिवसेनेनं सांगावे. का फक्त मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ऑन मुंबई बँक मुद्दावर ते म्हणाले, तसे पेपर समोर आले असतील तर तपासून योग्य ती कारवाई करावी.

काय म्हणाले संजय राऊत

भाजपला वाटतं की इतिहासाचं ज्ञान त्यांनाच आहे. इथं प्रत्येकजण नवा इतिहास लिहिण्यासाठी बसलाय. हे नवे इतिहासकार इतिहास बदलायला निघाले आहेत. आम्हाला टिपू सुलतानबद्दल माहिती आहे, भाजपकडून शिकण्याची गरज नाही. राष्ट्रपती कोविंद (Ramnath Kovind) यांनी कर्नाटकात जाऊन टिपू सुलतानचे कौतुक केले की ते एक ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सेनानी होते, असे म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रपतींचाही राजीनामा मागणार का? भाजपने याचा खुलासा करावा, असंही राऊत म्हणाले.

political
'..अन्यथा अस्लम शेख यांनी अवमान याचिकेसाठी तयार रहावं'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com