Delhi Metro Discount For Students: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना सवलत द्याव्यात अशी मागणी केली आहे. दिल्ली बसेसमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सेवा देण्याची योजना आखली जात असल्याचेही केजरीवाल म्हणाले आहेत.