भाजपवाल्यांना बलात्काराशिवाय काय येते? - केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनींना आलेल्या बलात्काराच्या धमक्‍यांचा संदर्भ 'भाजपवाल्यांना बलात्काराशिवाय काय येते?' अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्‌विटरद्वारे केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. "भाजपवाल्यांना बलात्काराशिवाय काही येते का? यांना देश चालवता येत नाही. यांनी देशाची वाट लावली आहे. केवळ दररोज मुलींना बलात्काराची धमकी देत आहेत', अशा तीव्र शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. 

दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर एका विद्यार्थिनीला बलात्काराची धमकी मिळाली होती. आता लैंगिक समानतेवर बोलणाऱ्या बनारस हिंदू विद्यापीठातील काही विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Web Title: Arvind Kejrwal Comment and critic on BJP about BHU issue