esakal | अरविंद केजरीवाल 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Arwind Kejriwal will take oath of CM on 16 February

दिल्ली विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर केजरीवाल यांनी 'दिल्लीवालों आय लव्ह यू' म्हणत दिल्लीकरांचे आभार मानले. केजरीवाल यांचा शपथविधी १४ फेब्रुवारीला होणार होता, मात्र ही तारीख बदलून हा शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे... कधी होणार केजरीवालांचा शपथविधी?

अरविंद केजरीवाल 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्लीकरांनी भरघोस मतांनी आम आदमी पक्षाला काल विजयी केले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विरजमान होण्याचा मान अरविंद केजरीवाल यांना दिला. ७० पैकी ६२ जागा जिंकत आपने पुन्हा हेच सिद्ध केले की विकास करणाऱ्या पक्षालाच जनता निवडून देते. काल दिल्ली विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर केजरीवाल यांनी 'दिल्लीवालों आय लव्ह यू' म्हणत दिल्लीकरांचे आभार मानले. केजरीवाल यांचा शपथविधी १४ फेब्रुवारीला होणार होता, मात्र ही तारीख बदलून हा शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे... कधी होणार केजरीवालांचा शपथविधी?

Delhi Elections : केजरी'वॉल' अभेद्य

2013 मध्ये आप आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी त्यांनी २८ डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर काँग्रेससोबत न पटल्याने सरकार कोसळलं पुन्हा एकदा २०१५मध्ये निवडणूका झाल्या व यावेळी त्यांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळीही १४ फेब्रुवारीलाच केजरीवालांचा शपथविधी होईल अशी चर्चा होती, मात्र ती तारीख पुढे ढकलून आता १६ फेब्रुवारीला केजरीवाल शपथ घेतील. दिल्लीतील प्रसिद्ध अशा रामलीला मैदानावर हा भव्यदिव्य शपथविधी होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगायोग म्हणजे २०१३ मध्ये केजरीवालांनी १४ फेब्रुवारीलाच राजीनामा दिला होता. त्यानंतर २०१५ मध्ये १४ फेब्रुवारीलाच शपथ घेतली त्यानंतर सरकारच्या यशस्वी कामाला ३ वर्ष पूर्ण झाल्यावर जो कार्यक्रम घेतला तोही १४ फेब्रुवारीलाच घेण्यात आला होता. त्यामुळे केजरीवाल आणि व्हॅलेंटाईन डे हे एक अनोखं नातं आहे. यावेळीही १४ फेब्रुवारीला शपथविधी होईल अशी आशा होती, मात्र तो १६ फेब्रुवारीला केजरीवाल मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपने करिष्मा दाखविला. सर्वशक्तीशाली भाजपलाही फक्त ८ जागा जिंकता आल्या तर काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही. केजरीवालांनी विकास कामांचा सपाटाच लावल्याने दिल्लीकरांनी पुन्हा एकदा त्यांना पसंती दिली अन् केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक झाली.