"चमत्कार झाला आणि बाबरी मशिद पडली?"

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीदीचा पाडाव करण्यात आला होता. या विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला आहे.

अयोध्येमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीदीचा पाडाव करण्यात आला होता. या विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा न्यायलयाने दिला आहे. शिवाय, या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. या सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 

हेही वाचा - बाबरी मशिद प्रकरण - गेल्या 28 वर्षात काय घडलं?

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या निकालाबाबत आपली नाराजी स्पष्ट केली आहे. ते म्हणालेत की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात हा दुखद दिवस आहे. आता न्यायलय म्हणत आहे की कोणताही कट नव्हता. मला जरा सांगा की एखादी कृती उत्स्फूर्तपणे होण्यापासून अपात्र ठरवण्यासाठी किती महिन्यांच्या तयारीची आवश्यकता असते. पुढे ते म्हणालेत की,  सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हा काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. याचं कारण असं की, सर्वोच्च न्यायालयाने आधीच सार्वजनिक जागेच्या वादाप्रकरणी म्हटलंय की, हे एक अत्यंत वाईट  पद्धतीने केलेलं हे कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच हा एका पूजास्थळाचा हेतूपूर्वक केलेला विध्वंस आहे. 

हा न्यायाचा विषय आहे. बाबरी मशीदीच्या विध्वंसासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना दोषी ठरवायला हवे. मात्र, त्यांचा राजकीय उद्धार करत मागेच त्यांना गृहमंत्री आणि मनुष्य बळ विकास मंत्री बनवलं गेलं. भाजप आज या प्रकरणामुळे सत्तेत आहे. असंही त्यांनी याप्रकरणी म्हटलं आहे. 

1992 साली रामजन्मभूमीचे आंदोलन सुरु झाले. याअंतर्गत 1992 साली देशव्यापी रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी केलं होतं. या रथयात्रेनंतर अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांकडून पाडण्यात आली होती. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 1992 पासून  प्रलंबित असणाऱ्या या खटल्याचा निकाल आज विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा - बाबरी प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल

दरम्यान, या निकालाचं आनंदाने स्वागत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटलंय की, सत्यमेव जयते! सीबीआयच्या विशेष न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. काँग्रेसद्वारे राजकारणासाठी पूज्य संतांवर, नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर, समाजसेवकांवर खोटे खटले दाखल केले होते. या खटल्यांत अडकवून त्यांना बदनाम केलं गेलं. या सगळ्या षड्यंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागायला हवी. अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 
 या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव निवृत्त होतील. बाबरी प्रकरणाच्या निकालासाठी त्यांची निवृत्ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आज पाच वाजता ते निवृत्त होणार आहेत. 

या निकालाचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आनंदाने स्वागत केलं आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटलंय की, सत्यमेव जयते! सीबीआयच्या विशेष न्यायलयाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. तत्कालीन काँग्रेसद्वारे राजकारणासाठी पूज्य संतांवर, नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर, समाजसेवकांवर खोटे खटले दाखल केले होते. या खटल्यांत अडकवून त्यांना बदनाम केलं गेलं. या सगळ्या षड्यंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागायला हवी. अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi on Babri demolition verdict says black day in history of Indian judiciary