esakal | बाबरी प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

babri

Babri Masjid demolition case या प्रकरणात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली.

बाबरी प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - 1992 मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला. प्रकरणात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली.

निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. 

- सीबीआयने 48 आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

- बाबरी प्रकरणातील 48 पैकी 17 जणांचे निधन

बाबरी मशिदीच्या प्रकरणाचा निकाल देताच सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव निवृत्त होतील. बाबरी प्रकरणाच्या निकालासाठी त्यांची निवृत्ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आज पाच वाजता ते निवृत्त होतील. 

loading image