हिंदू राष्ट्राचा उल्लेख करताच ओवैसी धीरेंद्र शास्त्रींवर भडकले; म्हणाले, हा सगळा बकवास.. I Asaduddin Owaisi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi On Dhirendra Krishna Shastri

संत आणि सनातनी एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Asaduddin Owaisi : हिंदू राष्ट्राचा उल्लेख करताच ओवैसी धीरेंद्र शास्त्रींवर भडकले; म्हणाले, हा सगळा बकवास..

Asaduddin Owaisi On Dhirendra Krishna Shastri : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारलाही घेरलं.

ओवैसी म्हणाले, 'असे (धीरेंद्र शास्त्री) लोक अनेकांचं बलिदान उद्ध्वस्त करत आहेत. मात्र, सरकार गप्प बसलंय. कोणी कसं हिंदू राष्ट्र बनवू शकतो? हा सगळा बकवास आहे. या देशात संविधान (Constitution) आहे आणि देशाचा कारभार संविधानानुसारच चालतो.'

धीरेंद्र शास्त्रींनी हिंदू राष्ट्राबाबत मोठं विधान केलंय. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, जेव्हा तीन तृतियांश लोक म्हणू लागतात की भारत हे हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) असावं, तेव्हा तसं होणार नाही का? हिंदूंनी फक्त हिंदू राष्ट्राचीच मागणी लावून धरावी. हे हिंदू स्वतःहून ठरवतील, एक टक्का लोक जरी मानत नसले तरी हरकत नाही. कारण, या एक टक्क लोकांना आम्ही महत्त्व देत नाही, असं ते म्हणाले होते.

संत आणि सनातनी एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हिंदू राष्ट्र झाल्यावर सनातन धर्माची महिमा वाढेल, प्रत्येक सनातनींनी संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं होतं.