दंगलीच्या मुद्यांवरून ओवेसींचा राज ठाकरेंवर पलटवार

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर चालू असल्याचा पलटवार एमआयएमचे नेते ओवेसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींच्या मदतीने भाजपाचा देशात दंगली घडवण्याचा कट असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला होता. या आरोपाला असदुद्दीन ओवेसींनी उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली- स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर चालू असल्याचा पलटवार एमआयएमचे नेते ओवेसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींच्या मदतीने भाजपाचा देशात दंगली घडवण्याचा कट असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला होता. या आरोपाला असदुद्दीन ओवेसींनी उत्तर दिले आहे.

स्वत:ला राजकारणात जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे. माझ्या नावाशिवाय हे यांचे राजकारण चालू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांवर तुम्ही हल्ले का करताय? समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी जरा आत्मपरीक्षण करायला हवं. राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमचं नाव घेत असाल, तर आमची त्यालाही हरकत नसल्याचे पुढे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. ओवेसी सारख्या लोकांशी बोलणी सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Web Title: Asaduddin Owaisi hits back to raj thackeray