राहुल गांधींनंतर ओवैसींचा मोदींवर हल्ला; पंतप्रधानांना हे माहितीये की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic gas price hike and Asaduddin Owaisi attack on Narendra Modi

राहुल गांधींनंतर ओवैसींचा मोदींवर हल्ला; पंतप्रधानांना हे माहितीये की...

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे माहीत आहे की, जोपर्यंत मी देशात द्वेषावर बोलत राहीन तोपर्यंत गॅसचे दर १,००० रुपयांनी वाढले तरी मतदार मलाच मतदान करतील, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले. घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्यानंतर विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. अशात ओवैसींनी हे वक्तव्य केले. (Domestic gas price hike and Asaduddin Owaisi attack on Narendra Modi)

शनिवारी घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. आजच्या दरवाढीमुळे गॅस सिलिंडरच्या किमतीने हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरवाढीवरून देशभरातील विरोधी पक्ष केंद्र सरकारचा निषेध करीत आहेत.

हेही वाचा: ‘तुम्ही वायनाडमधूनही हराल’ असे म्हणत ओवैसी राहुल गांधींना म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळून चुकले आहे. कितीही दरवाढ केली तरी लोक नरेंद्र मोदीलाच मतदान करतील. नागरिकांच्या उत्पन्नात वाढत होत नाही आहे. उलट महागाई वाढत आहे. आठ टक्के महागाई दर वाढणार आहे असा आरबीआयचा अहवाल येणार आहे, असेही हैदराबादचे खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्ला चढवत म्हणाले.

यापूर्वी ओवैसी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला होता. ‘तुम्ही वायनाडमधूनही हराल. तुम्ही हैदराबादमधून निवडणूक लढवा व नशीब अजमावा. तुम्ही मेडकमधूनही निवडणूक लढवू शकता, असे ते म्हणाले होते. तेलंगणामध्ये लढत फक्त काँग्रेस आणि टीआरएसमध्ये आहे. कोणाचेही नाव न घेता राहुल गांधी यांनी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि भाजप दोघेही काँग्रेसला टक्कर देऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला होता.

Web Title: Asaduddin Owaisi Narendra Modi Domestic Gas Price Hike By Rs 50

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top