
मशिदीच्या सर्वेक्षणमध्ये तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडलं आहे.
मुस्लिम पक्ष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार; काय म्हणाले ओवैसी?
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणमध्ये (Gyanvapi Masjid Survey) तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडलं आहे. त्यानंतर कोर्टानं जिथं शिवलिंग सापडलं, ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं (Court) एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत (Varanasi Gyanvapi Mosque Survey) तीन दिवस चाललेल्या सर्वेक्षणात सोमवारी शिवलिंग सापडल्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलंय. मुस्लीम पक्ष वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्वेक्षणाच्या कार्यवाहीच्या अहवालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहे, तर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ज्ञानवापी मशीद होती आणि राहील, असा धमकी वजा इशारा दिलाय. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत न्यायालयाच्या निर्देशानंतर सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्यानंतर मुस्लिम पक्षानं उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केलीय. न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लिम पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडलंय ते सील करण्याच्या ज्ञानवापी मशिदीच्या निर्णयाला मुस्लिम बाजू आव्हान देणार आहे.
हेही वाचा: भारतीय किसान युनियनमध्ये फूट; राकेश टिकैत केंद्र सरकारवर भडकले
वाळू खानाजवळ शिवलिंग आढळून आल्यानं ती जागा सील करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. यासोबतच सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आणि केंद्रीय दलाच्या तैनातीसह जागा सील करण्याचे आदेशही न्यायालयानं दिल्याचं कळतंय. वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील वाळू खानामध्ये शिवलिंग सापडल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण जागा सील करण्यात आलीय. आता याबाबत सीआरपीएफच्या हातात सुरक्षा असणार आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्यानंतर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी याला तीव्र विरोध केलाय. तेथील सर्वेक्षणाला विरोध करताना ते म्हणाले, वाराणसीत ज्ञानवापी मशीद होती आणि ती कायम राहील. हा भाग अयोध्येतील बाबरी मशिदीतील डिसेंबर 1949 ची पुनरावृत्ती आहे. या आदेशामुळं मशिदीचं धार्मिक स्वरूप बदललं आहे. 1991 च्या कायद्याचं उल्लंघन आहे, असं त्यांनी म्हटलंय.
Web Title: Asaduddin Owaisi Opposes Gyanvapi Mosque Survey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..