esakal | शाहीन बागेचा जालियनवाला बाग व्हायला वेळ नाही लागणार : ओवेसी
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin owaisi predicts firing at Shaheen baug after delhi elections.gif

भाजप नेत्यांची वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा सुरू असतानाच आता त्यात एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही उतरले आहेत. 

शाहीन बागेचा जालियनवाला बाग व्हायला वेळ नाही लागणार : ओवेसी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूका व सीएए-एनआरसीविरोध यामुळे देश अस्थिर बनलाय. अशातच दिल्ली निवडणूकांमुळे प्रचारसंभांचीही रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षातील मोठ-मोठे नेते दिल्लीत प्रचारसभा घेताना दिसताहेत. याच सभांमध्ये एकमेकांवर टीकेची झोड उठवणंही जोरदार सुरू आहे. भाजप नेत्यांची वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा सुरू असतानाच आता त्यात एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही उतरले आहेत. 

सावध राहा! देशात 'मुघल राज' येण्यास वेळ लागणार नाही : तेजस्वी सूर्या

ओवेसींनी चक्क दिल्लीत निवडणूका झाल्यावर मोठी घटना घडणार असे भविष्यच वर्तवले आहे. ८ फेब्रुवारीला दिल्लीच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शाहीन बागेचे रूपांतर हे जालियनवाला बागेत होईल असे वक्तव्य केले आहे. एकदा निवडणूका झाल्या की शाहीन बागेतील सीएए विरोधी आंदोलकांवर गोळीबार केला जाईल. भाजपच्या मंत्र्यानेच तशा घोषण दिल्या आहेत, त्यामुळे सरकारने याचे उत्तर द्यावे असे ओवेसींनी संसदेतून बाहेर पडल्यावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत एका प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थितांकडून 'देश के गद्दारों को गोली मारो सालों को' अशा घोषणा वदवून घेतल्या. त्यामुळे अनुराग ठाकूर नक्की कोणाला गोळ्या मारणार आहेत, हे त्यांनी सांगावे असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला. 

इम्रान खान म्हणतात, 'मोदींनी तो निर्णय घेऊन मोठी चूक केली'

शाहीन बागेतील मुस्लिम समाजाचे सीएएविरोधी आंदोलन तीव्र झाले असून, त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्गही बंद करावा लागला आहे, त्यामुळे भाजपचे काही नेते आक्रमक झाले आहेत.