इम्रान खान म्हणतात, 'मोदींनी तो निर्णय घेऊन मोठी चूक केली'

पीटीआय
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मुझफ्फराबाद येथे पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरच्या विधिमंडळात बोलताना खान यांनी आरोप केला की, पाकिस्तानच्या मुद्‌द्‌याचा वापर करून मोदींनी निवडणुकीत बहुमत प्राप्त केले असून, त्या बळावरच त्यांनी कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्लामाबाद : जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मघाती चूक केली असल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल (ता. ५) केली.

मुझफ्फराबाद येथे पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरच्या विधिमंडळात बोलताना खान यांनी आरोप केला की, पाकिस्तानच्या मुद्‌द्‌याचा वापर करून मोदींनी निवडणुकीत बहुमत प्राप्त केले असून, त्या बळावरच त्यांनी कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाभियोग सुनावणी : ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले 

मोदींनी आत्मघाती चूक केली आहे. कलम 370 रद्द करून मोदींनी कधीही दुरुस्त करता येणार नाही, अशी चूक केली आहे. त्यांनी भारताला अशा ठिकाणी आणले आहे की, आता त्यांनी ठरविले तरी त्यांना मागे जाता येणार नाही. हिंदू राष्ट्रवादाचा जीन आता बाटलीतून बाहेर आलेला आहे, जो पुन्हा बाटलीत पाठविणे अशक्‍य आहे, अशी टीका खान यांनी केली. अशाच प्रकारच्या घटनांच्या साखळीतून अंतिमतः स्वतंत्र काश्‍मीर आकाराला येईल, असा दावाही खान यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्‍मिरी जनतेच्या समर्थनार्थ दरवर्षी पाच फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये काश्‍मीर एकता दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी वरील वक्तव्य केले आहे.

काश्‍मीरबाबतचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan says PM Narendra Modi s removing of 370 article is wrong decision