AIMIM Chief Asaduddin Owaisi
esakal
देश
'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा
Owaisi questions freedom of expression in India : ओवेसींच्या या विधानामुळे पुन्हा एकदा संघाच्या भूमिकेबाबत वाद निर्माण झाला आहे.
Summary
ओवेसींनी "I Love Mohammad" वादग्रस्त का ठरतो यावर प्रश्न उपस्थित केला.
पोलिस आणि सत्ताधाऱ्यांवर पक्षपातीपणाचे आरोप केले.
आरएसएसच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि संघ परिवारावर जोरदार टीका केली आहे. "जर कोणी 'I Love Modi' म्हणालं तर त्याचं कौतुक केलं जातं; पण जर कोणी 'I Love Mohammad' म्हटलं तर त्यावर आक्षेप घेतला जातो. मग, या देशातील धार्मिक स्वातंत्र्य कुठं आहे?" असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.
