PM मोदींचा स्वॅग फक्त देशात; गलवान खोऱ्यातल्या फोटोवरून ओवैसींचा निशाणा

चीनच्या माध्यमांनी प्रसारित केलेल्या फोटोवरून ओवैसींनी प्रश्न उपस्थित केले.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiTeam eSaka

भारत आणि चीन दरम्यान असलेल्या सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांवरून दोन्ही देशांत गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे. लडाख आणि अरुणाचलप्रदेशच्या होणाऱ्या कथित घुसखोरीला भारत सरकारने कायम नकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबद्दल बोलताना भारतात कोणीही घुसलं नाही असं सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यातच आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील काही फोटो शेअर कर घुसखोरीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

चीनच्या प्रसार माध्यमांनी शेअर केलेले काही फोटो शेअर करत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काही फोटो शेअर करत असदुद्दीन ओवैसी यांनी "हे जर सत्य असेल तर, उत्तर देण्यासाठी ही गोष्ट भरपूर आहे. पंतप्रधान मोदींचा स्वॅग हा फक्त देशातील लोकांसाठी आहे. लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांचा सन्मान करायचं सोडून पंतप्रधान मोदी चीनच्या दाव्याला बळकटी देत आहेत. चीनने ताब्यात घेतलेली जमीन परत मिळवायची सोडून ते चीनची भाषा बोलता आहेत. मोदींनी आता पर्यंत चीनचं नाव देखील घेतलं नाही" असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.

Asaduddin Owaisi
...तर जीभ कापून टाकू; CM चंद्रशेखर राव यांची भाजप नेत्यांना धमकी
Asaduddin Owaisi
भाजप कार्यकारिणीची बैठक संपली; मोदींनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

ओवैसी यांनी शेअर केलेल्या चीनी प्रसार माध्यमाच्या ट्विटमध्ये काय लिहीलंय?

या ट्विटमध्ये लिहीलंय की, "जूनमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील चकमकीची नवीन छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली, या छायाचित्रात चिनी सैन्याने त्यांच्या ताब्यात आत्मसमर्पण केलेले भारतीय सैनिक दाखवले आहेत. भारतीय सैनिकांनी नव्याने झालेल्या सहमतीचे उल्लंघन केले आणि चिनी कर्मचार्‍यांवर प्रक्षोभक हल्ले केले, त्यामुळे इथे संघर्ष झाला."

दरम्यान, चीनकडून केल्या जाणाऱ्या या दाव्यामुळे या प्रकरणाचं गुढ आणखी वाढल्याचं बोललं जातं आहे. विरोधी पक्षांकडून वारंवरार या मुद्यावरून सरकारवर टीका होते आहे. संरक्षणाच्या दृष्टीने देखील हे एक नवं आव्हान असणार असल्याचं मत संरक्षण क्षेत्रातील तज्ञांनी मांडलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com