इस्लाममध्ये लग्नाचे नाते जन्मा-जन्माचे नसते : ओवेसी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 25 जुलै 2019

इस्लाममध्ये लग्नात जन्मा-जन्माचे नाते नसून, सात जन्माचे बंधनही नसते.

- असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एमआयएम. 

नवी दिल्ली : इस्लाममध्ये लग्नात जन्मा-जन्माचे नाते नसून, सात जन्माचे बंधनही नसते, असे 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन'चे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. 

तोंडी तलाक विधेयकावर सध्या संसदेत चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना ओवेसी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, इस्लाममध्ये लग्न सात जन्माचे बंधन नाही. तसेच इस्लाममध्ये लग्नात जन्मा-जन्माचे नातेही नाही. 23 लाख महिला घटस्फोटित आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, संयुक्त जनता दलाने (जेडीएस) या विधेयकाला विरोध केला आहे. खासदार राजीव रंजन सिंग यांनी सांगितले, की हे विधेयक एका विशिष्ट असा समुदायाचा अविश्वास व्यक्त करत आहे. आमचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi on Triple Talaq Bill