दोन मुलेच जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही - ओवैसी

Asaduddin Owaisi Latest Marathi News
Asaduddin Owaisi Latest Marathi NewsAsaduddin Owaisi Latest Marathi News
Updated on

नवी दिल्ली : देशात वाढत्या लोकसंख्येवरून वाद सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी एक विभाग करीत आहे. दरम्यान, ‘दोनच मुले जन्माला घालण्याची मर्यादा ठरवणाऱ्या कोणत्याही (Two children Law) कायद्याचे समर्थन करणार नाही’, असे एमआयएमचे नेते व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे. (Asaduddin Owaisi Latest Marathi News)

आपण चीनसारखी चूक करायला नको. यातून देशाला फायदा होणार नाही. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिमांना (muslim) जबाबदार धरू नका, असेही ओवैसी म्हणाले. ‘कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढल्याने अराजकता निर्माण होईल. यामुळे लोकसंख्येचा असमतोल व्हायला नको’, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले (Asaduddin Owaisi) की, त्यांचे आरोग्य मंत्री म्हणतात की, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर करणारे मुस्लिम आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) कोणत्याही कायद्याशिवाय प्रजनन दरात घट दिसून येते. भारताचा प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे. २०३० पर्यंत स्थिरता दिसेल. चीनची चूक आपण इथे पुन्हा करू नये, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची चर्चा फार दिवसांपासून सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे.

Asaduddin Owaisi Latest Marathi News
अशोकस्तंभाचा वाद : मूळ चिन्ह बनवणारे डिझायनर प्राणिसंग्रहालयात का गेले?

सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही

आसाम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, उत्तराखंड, तेलंगणा या राज्यांमध्येही एखाद्याला दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाही, असा नियम आहे. भाजप नेते गिरिराज सिंह यांनीही लोकसंख्येबाबत कायदा करण्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com