esakal | तरुण गोगोईंची तब्येत चिंताजनक; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अर्धवट सोडला दौरा

बोलून बातमी शोधा

tarun gogoi}

आसामचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या गोगोई यांना दोन नोव्हेंबरला जीएमसीएचमद्ये दाखल केलं होतं. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 

तरुण गोगोईंची तब्येत चिंताजनक; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अर्धवट सोडला दौरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण गोगोई यांची प्रकृती अत्यंत नाजूक अशी आहे. गोगोई यांच्या प्रकृतीची माहिती मिलाल्यानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी डिब्रूगढचा दौरा रद्द करून गुवाहाटीला निघाले आहेत. सोनोवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 

सोनावाल यांनी म्हटलं की, माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. ते नेहमीच माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. राज्यातील जनतेच्या वतीने त्यांचं आरोग्य सुधारण्याची प्रार्थना करतो असंही त्यांनी म्हटलं. 

गुवाहाटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अभिजीत शर्मा यांनी सांगितलं की, तरुण गोगोई यांच्यावर एका डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होत आहेत.  गोगोई यांची प्रकृती नाजूक असून डॉक्टर त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

गोगोई यांच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयात आसामचे आरोग्यमंत्री हेमंत यांनी म्हटलं की, माजी मुख्यमंत्र्याची प्रकृती चिंताजनक आहे. ते व्हेटिंलेटलरवर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आता देवाचा आशीर्वाद आणि प्रार्थनेची गरज आहे. गोगोई यांचे अवयव काम करत नसून केवळ मेंदूत संवेदना आहेत आणि डोळे उघडे आहेत. 

हे वाचा - Cyclone Nivar - भारतावर चक्रीवादळाचं संकट; 120 KM वेगाने धडकणार

रविवारी सहा तासापर्यंत त्यांचे डायलिसिस झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा डायलिसिस करण्याची गरज होती. मात्र त्यांची प्रकृती पाहता आता ते शक्य नाही. आसामचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या गोगोई यांना दोन नोव्हेंबरला जीएमसीएचमद्ये दाखल केलं होतं. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. गोगोई यांना 25 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. 25 ऑक्टोंबरला रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता पण त्यानंतर पुन्हा आठवड्याभरात त्यांची प्रकृती बिघडली.