Cyclone Nivar - भारतावर चक्रीवादळाचं संकट; 120 KM वेगाने धडकणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

बंगालला मे महिन्यात अम्फानचा तडाखा बसला होता. तर महाराष्ट्रात जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यानंतर आता निवारचं संकट भारतात घोंगावत आहे

नवी दिल्ली - बंगालला मे महिन्यात अम्फानचा तडाखा बसला होता. तर महाराष्ट्रात जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यानंतर आता निवारचं संकट भारतात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ 25 नोव्हेंबरला तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाचे नाव निवार असं ठेवण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या वाऱ्याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रतितास इतका आहे. 

तामिळनाडु आणि पुद्दुचेरीच्या काही भागांमध्ये इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीत अलर्ट दिला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आधीच समुद्रात गेलेल्यांनासुद्धा याची माहिती देण्यात आली असल्याचं ते म्हणाले. 

हे वाचा - मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढतोय? एकूण रुग्णांचा आकडा तीन लाखांच्या जवळ

भारतावर दोन चक्रीवादळे घोंगावत आहे. अरबी समुद्रात गती नावाचं वादळ आफ्रिकेतील देश सोमालियामध्ये थडकल्यानंतर शांत झालं आहे. त्यामुळे आता भारताला त्याचा फारसा धोका नाही. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार वादळ वेगाने वाढत आहे. 

बंगालच्या उपसागरातील वादळ पुढे सरकत आहे. सध्या पुद्दुचेरीपासून दक्षिणेकडे हे वादळ 600 किलोमीटर  अंतरावर आहेत. तर चेन्नईपासून पुर्वेला 630 किलोमीटर अंतरावर आहे. पुढच्या 24 तासात हे वादळ चक्रीवादळात बदलेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. 

हे वाचा - Share Market: सत्राच्या सुरुवातीलाच बाजारात तेजी; सेन्सेक्स 44,225.53 अंशांवर

बंगालच्या खाडीतील वादळ उत्तर पश्चिम दिशेनं वेगाने सरकत आहे. 25 नोव्हेंबरला दुपारी तामिळनाडु आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर पोहोचेल. तेव्हा 100 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. 

दक्षिण भारतामध्ये 23 नोव्हेंबरला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तामिळनाडु, पुद्दुचेरीसह भागामध्ये 24 आणि 26 नोव्हेंबर या दरम्यान, वीजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये 25 ते 26 नोव्हेंबपर्यंत पाऊस पडले असा अंदाज वर्तवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyclone nivar will hit tamilnadu and pudducherry india cyclone