esakal | Lakhimpur Kheri : आशिष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला; आणखी दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

aashish mishra

Lakhimpur Kheri : आशिष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला; 2 अटकेत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील (lakhimpur kheri violence) मुख्य आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा पुत्र आशीष मिश्रा (Ashish Mishra) याचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी (ता.१३) फेटाळला. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना विशेष तपास पथकाने अटक केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या तात्काळ राजीनाम्याची तसेच, निष्पक्ष तपासासाठी सर्वोच्च न्यायालयातील दोन विद्यमान न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्याची मागणी काँग्रेसने केली.

हेही वाचा: आग्रा : शिवपालना अजूनही युतीची आशा

आरोपींची संख्या सहावर

विशेष तपास पथकाच्या १२ तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला आशीष मिश्राला अटक केली होती. मंगळवारपासून तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अंकित दास आणि लतीफ या दोघांना अटक केली असून, आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. आशीष आणि अन्य एक आरोपी आशीष पांडे यांनी बुधवारी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

हेही वाचा: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

loading image
go to top