राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात आली. तर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. 

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 99 जागांवर विजय झाला तर भाजपला 73 जागा मिळाल्या. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आज काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत तर उपमुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली. 

दरम्यान, अशोक गेहलोत हे राजस्थानातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, त्यांनी दोनवेळेस राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. तसेच ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर सचिन पायलट यांनी केंद्रीयमंत्रिपदही भूषविले. आता त्यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

Web Title: Ashok Gehlot elected as Chief Minister of Rajsthan