काश्मीरमधील परिस्थितीवर अभिनेत्रीच्या ट्विटला निर्मात्याचे उत्तर

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

काश्‍मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर येत असताना अभिनेत्री रिचा चढ्ढाने एका काश्मीरी मित्रासोबत केलेल्या चॅटिगचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केले आहे, तिने म्हटले आहे, की उद्या ईद आहे. मी सरकारला विनंती करते की त्यांनी काश्मीरमधील नाकाबंदी हटविली पाहिजे. नागरिक आपले वृद्ध आई-बाप आणि मुलांबद्दल काळजीत आहेत. माझे काही मित्र झोपू शकलेले नाहीत.

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने आज उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने संचारबंदीबाबत केलेल्या ट्विटला चित्रपट निर्मात्याने उत्तर दिले आहे.

काश्मीरमधील डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे. जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूर आणि रियासी या पाचही जिल्ह्यांतील सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आले आहेत. पूँछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांतील संचारबंदी मात्र कायम आहे.

काश्‍मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर येत असताना अभिनेत्री रिचा चढ्ढाने एका काश्मीरी मित्रासोबत केलेल्या चॅटिगचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केले आहे, तिने म्हटले आहे, की उद्या ईद आहे. मी सरकारला विनंती करते की त्यांनी काश्मीरमधील नाकाबंदी हटविली पाहिजे. नागरिक आपले वृद्ध आई-बाप आणि मुलांबद्दल काळजीत आहेत. माझे काही मित्र झोपू शकलेले नाहीत.  

रिचाच्या या ट्विटनंतर तिला उत्तर देताना निर्माते अशोक पंडित म्हणाले, की रिचा ईद मुबारक. काश्मीरमध्ये काहीही काळजी करण्यासारखे नाही. सर्व नियंत्रणात आहे. दगडफेक करणारे, स्वातंत्र्य मागणारे आणि पाकिस्तानच्या पाठिराख्यांना इथे धोका आहे. तुमचे मित्र त्यामुळे झोपू शकले नसतील. 70 वर्ष जुन्या रोगावर औषधोपचार झाले आहेत, वेळ लागणारच.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashoke Pandit twitter reaction on Richa Chadha tweet on Jammu Kashmir Article 370