Ashutosh Ranka Attack : CJP प्रवक्ता आशुतोष रांका यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण; सरकारी शाळेच्या पाहणीवरून राडा, भाजपवर गंभीर आरोप

Ashutosh Ranka Assault : राजस्थानमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीदरम्यान CJP प्रवक्ता आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. CJPने या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा दावा केला आहे.
Ashutosh Ranka Attack rajasthan

Ashutosh Ranka Attack rajasthan

esakal

Updated on

CJP Ashutosh Ranka : राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या दुरवस्थेवरून मोठा गोंधळ झाला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत कार्यकर्ते शाळेची पाहणी करण्यासाठी गावात पोहोचले होते. मात्र, ग्रामस्थांनी त्यांचा तीव्र विरोध करत त्यांना गावातून हाकलून दिले. यावेळी कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की तसेच त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com