Polluted Cities : आशियातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 8 ठिकाणांचा समावेश; Gurugram अव्वल

आशियातील सर्वांत प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे.
Asia's 10 Most Polluted Cities
Asia's 10 Most Polluted Citiesesakal
Summary

आशियातील सर्वांत प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारसह (Central Government) राज्यांमध्ये विविध उपाय योजले जात असतात. पण, त्याला फारसं यश येत नसल्याचं ‘जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांका’नं (Global Air Quality Index) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातील नोंदीतून दिसत आहे. आशियातील सर्वांत प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील आठ शहरांचा समावेश आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळं प्रदूषणाची पातळी खराब श्रेणीत पोहोचलेल्या दिल्लीचा (Delhi) समावेश यात नाही, हे विशेष मानलं जात आहे. हवा निर्देशांक अहवालानुसार, गुरुग्राम हे सर्वांत प्रदूषित शहर ठरलं आहे. जागतिक पातळीवरील हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी पुरवून नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृती करणं हे ‘जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकाचं उद्दिष्ट आहे.

Asia's 10 Most Polluted Cities
राष्ट्रवादीला आणखी 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल; शिंदे गटाच्या 'या' मंत्र्याचा थेट इशारा

रविवारी (ता. 23) सकाळी केलेल्या पाहणीनुसार, गुरुग्राममध्ये (Gurugram) सर्वाधिक प्रदूषण नोंदविण्यात आलं. तिथं हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) ६७९ होता. दुसऱ्या स्थानी हरियानातील रेवरीनजीक धरुहेरा (एक्यूआय- ५४३) आहे. बिहारमधील मुझफ्परपूरचा (एक्यूआय- ३१६) तिसऱ्या क्रमांक आहे. भारता व्यतिरिक्त चीनमधील शिओशिशांग पोर्ट आणि मंगोलियातील बयान्खोशू या शहरांचा समावेश या यादीत आहे.

यादीतील भारतीय शहरांमधील ठिकाणं आणि त्यांचा एक्यूआय

  • तालकटोर (लखनौ) : २९८

  • डीआरसीसी आनंदपूर (बेगुसराई -बिहार) : २६९

  • भोपाळ चौराह, देवास (मध्य प्रदेश) : २६६

  • खडकपाडा, कल्याण (ठाणे) : २५६

  • दर्शन नगर, छपरा ( बिहार) : २३९

Asia's 10 Most Polluted Cities
Prithviraj Chavan : देशात जातीयता, धर्मांधतेचं विष पेरलं जातंय; पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल

दिल्लीकरांनी बरंच कष्ट घेतलंय : केजरीवाल

आशिया खंडातील दहा सर्वाधिक हवा प्रदूषण असणाऱ्या शहरांत राजधानी दिल्लीचा समावेश नसल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, 'काही वर्षांपूर्वी दिल्ली हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक होतं. पण, आता ही परिस्थिती बदलली आहे. दिल्लीच्या नागरिकांनी यासाठी बरंच कष्ट घेतले आहेत. परंतु, अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही परिश्रम करत राहू आणि दिल्लीला जगातील सर्वांत सुंदर शहरांपैकी एक बनवू.'

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com