Positive Story : पत्नी आणि मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान; दररोज हजारो लोकांचे पोट भरणारा अवलिया

asif sohail
asif sohail

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान अशा अनेक कहाण्या पहायला मिळाल्या ज्यांनी मानवतेचे दर्शन घडवलं. अशा कठीण काळात याप्रकारची निस्वार्थी सेवा पाहूनच माणुसकीवरचा विश्वास अधिक वृद्धींगत होतो.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरिब आणि हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचे खूप हाल झाले पण त्यांच्या मदतीला अगदी देवदूतासारखेच काही लोक धावून आले. अशीच एक कहाणी आहे तेलंगाना राज्यातील मोहम्मद आसिफ सोहेल या व्यक्तीची!

आसिफ सोहेल हे स्वत:ची एक संस्था चालवतात. या संस्थेअंतर्गत ते गरिब आणि निराधार लोकांच्या भुकेचा प्रश्न मिटवतात. ते गरिब लोकांना पोट भरेल असं जेवण पुरवतात. पण त्यांचं हे काम यासाठी अधिक खास आहे की ते ही संस्था आपल्या पत्नी आणि मुलीच्या आठवणीत चालवतात. त्यांनी ही संस्था आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरु केली होती. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. आसिफ रोज गरिबांना मोफत जेवण देतात. त्यांचं हे काम वर्षानुवर्षे सुरु आहे. 

याबाबत माहिती देताना आसिफ यांनी सांगितलं की, आम्ही हे काम गेल्या 10 वर्षांपासून करतोय. आम्ही आता जवळपास हजारो लोकांना हे अन्न पुरवतो आहे. आता यामध्ये लोकांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. तसेच बेघर झालेल्या लोकांची संख्यादेखील खूप आहे. निराधार-गरिब अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. तसेच अनेक संस्था स्वतंत्रपणे यासाठी काम करताना दिसत आहेत. आसिफ हे यापैकीच एक आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com