esakal | 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sibal

सिब्बल यांनी म्हटलंय की, आत्मपरिक्षण करण्याची वेळदेखील आता निघून गेली आहे.

'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या खराब कामगिरीबाबत आता जेष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मौन सोडलं आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की, लोकांनी काँग्रेसकडे प्रभावी पर्याय म्हणून पाहिले नाहीये तसेच पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाला भेडसावत असणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिलेले नाहीये. काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

हेही वाचा - विराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...
काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या समस्या आणि त्यांची उत्तरे माहित आहेत पण काँग्रेसला ती उत्तरे शोधायच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना ओळखायचेच नाहीये. आमच्यातील काहींनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरवली. आणि आपण सगळे त्याचे परिणाम पाहतोय. फक्त बिहारमधीलच नव्हे तर देशातील लोक जिथे कुठे पोटनिवडणुका होतायत तिथे काँग्रेसला एक चांगला पर्याय म्हणून पाहत नाहीत. गुजरातच्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला पराभव बघायला लागला. तीन ठिकाणी उमदेवारांचे डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतही असेच घडले. देशातील लोक आपल्याकडे सक्षम पर्याय म्हणून पाहतच नसल्याचे दिसून येतंय, असं त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप

पुढे त्यांनी म्हटलंय की, आत्मपरिक्षण करण्याची वेळदेखील आता निघून गेली आहे. काँग्रेस वर्कींग कमिटीचे एक माझे सहकारी मला म्हणाले की, मी आशा करतोय की काँग्रेस पुन्हा आत्मपरिक्षण करेल. जर गेल्या सहा वर्षांत काँग्रेसने आत्मपरिक्षण केले नसेल तर आता काय आशा आहेत याच्या? आम्हाला चांगलं माहितीय की काँग्रेसमध्ये काय चुकतंय.

संघटनात्मकरित्या काय चुकतंय हेही ठाऊक आहे. सगळ्याची उत्तरे आहेत. काँग्रेसला स्वत:ला उत्तरे माहित आहेत. पण उत्तरे शोधायची इच्छा नाहीये, ही अडचण आहे. असं असेल तर काँग्रेसचा आलेख घसरताच राहणार आहे. काँग्रेसने धाडस दाखवून या प्रश्नांच्या उत्तरांना बगल देण्याऐवजी त्यांना लक्ष्यात घ्यायला हवं. 
सिबल यांनी पुढे म्हटलंय की, या समस्या लक्षात घ्यायला असमर्थता यासाठी दिसून येते कारण काँग्रेस वर्कींग कमिटी ही निर्विचित आहे.  लोकशाही प्रक्रिया स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. अगदी काँग्रेस वर्कींग कमिटीच्या घटनेत सुद्धा ती असायला पाहिजे. काँग्रेसच्या घटनेत लोकशाहीची तरतूद दिसून येते. पण निर्वाचित सदस्यांकडून तुम्ही प्रश्न विचारण्याची अपेक्षा करुच शकत नाही.