IPS अधिकारी मोहिता बनल्या KBC च्या दुसऱ्या करोडपती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

त्या सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर देतील का, हेच पाहण्याचे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'च्या 12 व्या पर्वात आता दुसरी एक खेळाडू करोडपती बनली आहे. आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मोहिता शर्मा या पर्वातील दुसऱ्या अशा खेळाडू आहेत ज्यांनी एक कोटीच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहे. दिल्लीच्या नाजिया नसीम यांनी अलिकडेच एक कोटी रुपये जिंकले होते. त्यांच्या विजयानंतर मोहिता या दुसऱ्या खेळाडू आहेत ज्यांची घोषणा सोनी टिव्हीने करोडपती म्हणून केली आहे.

हेही वाचा - 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

हा एपिसोड उद्या 17 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. या एपिसोडमधील उत्कंठावर्धक एक व्हिडीओ चॅनेलच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी एक कोटी रुपयाच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊन हे पैसे जिंकले आहेत. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन या व्हिडीओत दिसत आहे जे म्हणतात की, हा एक कोटीचा प्रश्न आहे, त्यामुळे सावधानतेने खेळा. 

मोहिता शर्मा या प्रश्नाचे उत्तर बरोबर देतात आणि त्यानंतर त्यांचा गगनात न मावणारा आनंद पाहण्याजोगा आहे. या व्हिडोओत एके ठिकाणी त्या आपल्या वर्दीत देखील दिसून आल्या. एक कोटी जिंकल्यानंतर त्या सात कोटीच्या जॅकपॉट प्रश्नाचेही उत्तर द्यायचा  प्रयत्न करतात. 

हेही वाचा - जेडीयूला 12 तर भाजपला 18 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता; मोदींचा पत्ता कट

त्या सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर देतील का, हेच पाहण्याचे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता हा एपिसोड प्रसारित होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्यूनिकेशनच्या माजी विद्यार्थीनी असलेल्या नाजिया नसीम यांनी एक कोटी रुपये जिंकले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kaun banega crorepati 12 ips officer mohita sharma became second crorepati